Sunday, August 12, 2012

'जयभीम, कॉम्रेड' नक्षलवादाचा उदो उदो

सुभाष थोरात

आनंद पटवर्धन एक यशस्वी माहितीपटकार आहेत. सामाजिक विषयांवर त्यांनी आजवर अनेक माहितीपट बनवलेले आहेत. अनेक माहितीपटांना राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच या माहितीपटांची गंभीरपणे चर्चा होत आलेली आहे. थोडक्यात जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांचे हे माहितीपट असतात. या माहितीपटांतून ते एका विशिष्ट पुरोगामी दृष्टिकोनातून जनतेचे प्रश्न मांडत असतात. भारतातील नक्षलवादी चळवळीबद्दल त्यांना सहानुभूती आहे असे त्यांच्या एकंदर माहितीपटांतून जाणवते. ''जयभीम, कॉम्रेड'' हा तीन तासांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला त्यांचा माहितीपट त्याला अपवाद नाही. त्यांचा प्रत्येक माहितीपट सरकारच्या सेन्सॉर बोर्डाने अडवलेला आहे आणि त्यामध्ये ''कट'' सुचवून त्याला परवानगी देण्याची  भूमिका घेतली आहे आणि प्रत्येक वेळी त्यांना यासाठी न्यायालयीन लढाई करावी लागली आहे. पण ''जयभीम, कॉम्रेड''ला मात्र असे कट सुचवले गेले नाहीत आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. दलित जनतेच्या मानवी अधिकारांचा आणि तिच्यावर आजही होणार्‍या अत्याचारांचा प्रश्न या माहितीपटाच्या वेंत्र्द्रस्थानी असल्यामुळे काचित सेन्सॉर बोर्डाने आणि राष्ट्रीय पुरस्कार देणार्‍या समितीने या माहितीपटाला  झुकते माप दिलेले असावे. कारण आज नक्षल समस्या इतकी उग्र असताना आणि ज्यांच्यावर नक्षल असल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे ते भूमिगत आहेत विंत्र्वा अटक आहेत अशा दलित समाजातून आलेल्या कलावंतांबद्दल या माहितीपटात माहिती देऊनही या माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या निधनानंतर रिपब्लिकन पक्षाची जी अवस्था झाली, त्या परिणामी खेड्यापाड्यातून आणि शहरांतूनही दलित जनतेवरचे अन्याय-अत्याचार वाढत गेले. याची प्रतिक्रिया म्हणून ''दलित पँथर'' अस्तित्वात आली पण तिचीही गत रिपब्लिकन पक्षासारखीच झाली. अशा परिस्थितीत अनेक संवेनशील, अन्यायाबद्दल चीड असणारे प्रामाणिक तरुण मार्क्सवादाकडे वळले, मार्क्सवादावर आधारित असणार्‍या वेगवेगळ्या कम्युनिस्ट पक्षांमध्ये काम करू लागले. काही नक्षल चळवळीत घुसले. ''जयभीम, कॉम्रेड'' हा माहितीपट नक्षल विचारांकडे झुकलेल्या कवीगायक असलेल्या कार्यकर्त्यांबद्दल आपल्याला सांगताना दिसतो. दलित अत्याचारांच्या आजवर ज्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत त्या पार्श्र्वभूमीवर या कार्यकर्त्यांबद्दलचे कथन आपल्यासमोर येते. आंध्र प्रेशातील लोकप्रिय गायक गदर तसेच सुप्रसिद्ध कवी वरवर राव, पत्रकार गुरबीर सिंग, हे नक्षल समर्थक मानले जातात. त्यांच्या मुलाखती या माहितीपटात आहेत. कारण या सगळ्यांनी शाहीर विलास घोगरे यांच्याबरोबर काम वेत्र्लेले आहे.

माहितीपटाची सुरुवात होते ती विलास घोगरे बद्दलच्या माहितीतून. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळा विटंबनेमुळे जो जनतेत क्षोभ निर्माण झाला, त्यावेळेस संतप्त दलित जनतेवर बेकायेशीरपणे काहीही कारण नसताना आणि जनतेला गोळीबाराची सूचना न देता, हवेत गोळीबार न करता गोळीबार करीत सरळ पोलिसांनी १३ लोकांना गोळ्या घातल्या. या घटनेमुळे अत्यंत व्यथित होऊन शाहीर विलास घोगरे यांना आत्महत्या वेत्र्ली. अशा पार्श्र्वभूमीवर आनंद पटवर्धन यांनी या कवीगायकांबद्दलची माहिती आपल्याला सांगितली आहे. अशा प्रकारे खैरलांजीची घटना, नामांतराच्या वेळी झालेल्या अत्याचारांच्या घटना, इतर छोट्यामोठ्या, व्यक्तिगत अत्याचारांच्या घटना पार्श्र्वभूमीला घेऊन दलित जनतेबद्दलचे प्रश्न मांडले गेले आहेत. याचबरोबर सफाई कामगारांची परिस्थिती, अनेक शिकलेल्या तरुणांना रोजगार नसल्याने सफाईचे काम करावे लागते त्याबद्दलची माहिती, दलित नेत्यांच्या संधिसाधूपणाची उदाहरणे, अशा पद्धतीने आजच्या दलित जनतेसमोरच्या प्रश्नांना पुढे आणण्याचा आनंद पटवर्धन यांचा प्रयत्न आहे. अर्थात या माहितीपटाची भट्टी नीट जमलेली नाही. सगळे वेगवेगळे तुकडे एकमेकांत जोडले आहेत ते एकजीव वाटत नाहीत कारण या पार्श्र्वभूमीवर आनंद पटवर्धनांना वेगळी राजकीय भूमिका पुढे आणण्याची घाई झालेली दिसते. या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक अखेर नलक्षवादी मार्गात आहे हे त्यांना प्रच्छन्नापणे सुचवायचे आहे.

आनंद पटवर्धन

या माहितीपटात प्रामुख्याने जी पात्रे येतात ती सर्व नक्षल चळवळीशी संबंधित असणे हा योगायोग वाटत नाही. आनंद पटवर्धनांना ही गोष्ट माहीत नसेल असे नाही. आज त्यांची राजकीय भूमिका काहीही असली तरी ते देशातील अनेक नक्षल समर्थित विचारवंतांप्रमाणे, कलावंतांप्रमाणे एक कलावंत आहेत. कबीर कला मंचच्या कलावंतांबद्दल या माहितीपटात भरभरून माहिती देण्यात आली आहे. हे कलावंत सध्या भूमिगत आहेत. नक्षलवादी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विद्रोही पाक्षिकाचे संपादक असलेले सुधीर ढवळे हे सध्या नक्षलवादाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटवेत्र्साठी एक कमिटीही बनवली गेली आहे. आनंद पटवर्धन त्या कमिटीत आहेत.नक्षलवाद ज्याला आज माओवाद म्हटले जाते ती एक अति डावी विचारसरणी आहे. आजच्या भारतीय वर्गीय परिस्थितीचे चुकीचे मापन करून चीनमध्ये ज्या पद्धतीने, मार्गाने कम्युनिस्ट क्रांती झाली तशी क्रांती भारतात करण्याचा त्यांचा हेतू आहे. पण चीनमध्ये क्रांती झाली त्यावेळची चीनमधील राजकीय परिस्थिती आणि वर्गीय वास्तव भारतातील राजकीय परिस्थिती आणि वर्गीय वास्तवाच्या पूर्णपणे भिन्ना आहे. त्यावेळच्या चीनमध्ये 'लोकशाही' नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती. आज भारतात नावाला का होईना ती गोष्ट अस्तित्वात आहे. उघडपणे संघटना बांधणे, आपल्या विचारांचा प्रसार करणे, या गोष्टी इथे करता येतात. त्यामुळे जनतेची तयारी करून न घेता ''सशस्र क्रांती'' हाच एकमेव मार्ग आहे असे म्हणणे हे अतिशहाणपणाचे लक्षण आहे. आजचे आधुनिक 'स्टेट' अत्यंत शक्तिशाली बनले आहे. क्युबाच्या सशस्र क्रांतीनंतर जगात वुत्र्ठेही या मार्गाने क्रांती झालेली नाही. त्यामुळे माओवाद्यांची ही भूमिका भारतीय भांडवली राज्यकर्त्यांना, सत्ताधारी वर्गांना  गोरगरीब दलित, आदिवासी, बहुजन जनतेवर अत्याचार करण्याचीच सोय करून देते. नक्षल म्हणून आजवर जे फाशी दिले गेले आहेत ते सर्व दलित आणि आदिवासी आहेत. उच्चजातवर्गातून आलेले अतिसाहसी तरुण मार्क्सवादाचा आजच्या परिस्थितीत चुकीचा अर्थ लावून माओवादाच्या नावाखाली शोषित जनसमुहांना जणू मृत्यूच्या दारी ढकलत आहेत. एखाद्या विशिष्ट प्रसंगी आवश्यक वाटल्यास शस्र हाती घेणे चुकीचे ठरत नाही. पण 'सशस्र क्रांती' हाच कामगार क्रांतीचा एकमेव मार्ग आहे अशी भूमिका घेणे हे आजच्या परिस्थितीत शोषित जनतेशी द्रोह करणेच आहे.

आनंद पटवर्धन यांच्या माहितीपटातून अप्रत्यक्षपणे याच विचारांची पाठराखण वेत्र्ली गेली आहे. ती इतकी चलाख पद्धतीने वेत्र्ली आहे की, हा माहितीपट म्हणजे जणू दलित जनतेच्या मानवअधिकाराची बाजू मांडणारा, बाजू घेणारा आहे अशी समजूत व्हावी. माहितीपट पाहताना ही गोष्ट लक्षात येते. मानवअधिकाराचा मुद्दा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची खल घेतली जाईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आनंद पटवर्धनांनी हा चित्रपट भारतीय प्रेक्षक डोळ्यासमोर न ठेवता परदेशी प्रेक्षकांसाठी बनवल्याचे लक्षात येते. त्यामुळे बर्‍याच गोष्टी वरवरच्या आणि प्राथमिक पातळीवर निर्माण वेत्र्ल्या गेल्या आहेत. एकंदर हा माहितीपट अनेक घटनांची नीट सुसंगती नसल्यामुळे विस्कळीत आणि खूप प्राथमिक पातळीवरचा वाटतो. जातिव्यवस्थेच्या प्रश्नाचे जे गांभीर्य त्यातून पुढे आले पाहिजे ते येत नाही. कारण आनंद पटवर्धनांचा मूळ हेतू नक्षल चळवळीशी संबंधित असलेल्या शाहीर विलास घोगरे यांना एक श्रद्धांजली वाहण्याचा आणि त्या अनुषंगाने आज सुरू असलेल्या नक्षल समर्थक मानल्या जाणार्‍या कलावंतांची ओळख करून द्यायचा आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत. नक्षलवादाचा  उदो उदो त्यातून जाणवतो यात मात्र शंका नाही.

No comments:

Post a Comment